About Us

आजकाल कुठेही नजर फिरवा, आर्थिक समृद्धिबरोबरच सांस्कृतिक कंगालपणाच्या खुणाही पटकन नजरेत भरतात.हातातला अत्याधुनिक मोबाईलफोन आपले आयुष्य व्यापून राहिला आहे.टीव्हीवरचा रंगबेरंगी जल्लोष,उन्माद याने भावनांचे बधिरीकरण होऊ लागले आहे.टीव्हीवर काल काय बघितले ते कदाचित आज आठवणार नाही,पण वीस-तीस वर्षापूर्वी वाचलेले मात्र आजही आठवते.मनावर कोरले जाण्याची,संस्कार करण्याची लिखित शब्दांची क्षमता अजूनही उल्लेखनीय आहे. आर्थिक समृद्धीइतकीच सांस्कृतिक समृद्धीचीही समाजाला गरज असते.ही सांस्कृतिक समृद्धी सकस साहित्य वाचनाच्या माध्यमातून वाढवण्याचा अक्षरबाग ग्रंथालय हा एक छोटा प्रयत्न आहे. वाचकांना वाचनाचा छंद माफक दरात जोपासता यावा,नवीन वाचक निर्माण व्हावेत,लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी अक्षरबाग ग्रंथालय कार्यरत आहे.

Our Mission:

अक्षरबाग ग्रंथालय काही ध्येय उराशी बाळगून कार्यरत आहे...वाचकांना वाचनाचा छंद अत्यल्प दरात जोपासता यावा.लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन, नवीन वाचक निर्माण व्हावेत.चांगले,सकस साहित्य वाचकापर्यंत पोहचवून ग्रंथखरेदीला उत्तेजन देणे. मराठी भाषेच्या व साहित्याच्या संवर्धंनात सहयोग देणे.