About Us

व्यवस्थेला प्रश्न विचारणारा,चिकिस्ता करणारा,नियमांचा आदर व कदर करणारा,समतोल विचार करणारा,दुसर्यािचे दुख: पाहून हेलावणारा अशा संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ व्यक्तीची निर्मिती होण्यात निर्मितीक्षम वाचनाचा व चिंतनाचा मोठा वाटा असतो या विचारावर अक्षरबाग ग्रंथालय व्यवस्थापनाची नितांत श्रद्धा आहे. इतरांशी सौजन्याने वागणारा सुसंकृत व्यक्ती निर्माण होण्यात वाचन व मनन उपयुक्त ठरू शकते.अशा आदर्श समाज निर्मितीत अक्षरबाग ग्रंथालय आपला खारीचा वाटा उचलत आहे.

Our Mission:

अक्षरबाग ग्रंथालय काही ध्येय उराशी बाळगून कार्यरत आहे... १)वाचकांना वाचनाचा छंद अत्यल्प दरात जोपासता यावा. २)लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन, नवीन वाचक निर्माण व्हावेत. ३)चांगले,सकस साहित्य वाचकापर्यंत पोहचवून ग्रंथखरेदीला उत्तेजन देणे. मराठी भाषेच्या व साहित्याच्या संवर्धंनात सहयोग देणे.