• Home / /
  • Terms & Condtions

Terms & Condtions

१.मायमराठी ला प्राधान्य देऊन ग्रंथालय कार्यरत राहील.ग्रंथालयाचे सभासद होण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही.दोन फोटो व रहिवासी पुरावा जमा करणे आवश्यक आहे.
२.पुस्तकावर कोणत्याही प्रकारच्या खाना-खुणा करू नयेत.तसेच ती व्यवस्थित हातळावीत ही नम्र विनंती आहे.आपल्याकडून पुस्तक फाटल्यास,खराब अथवा गहाळ झाल्यास त्याच पुस्तकाची नवीन प्रत ग्रंथालयात जमा करण्यास आपण बांधील आहात.
३.पुस्तक ३० दिवसात परत करावे.अन्यथा प्रतिदिन,प्रतिपुस्तक २ रुपये अतिरिक्त शुल्क आकरण्यात येईल.
४.नवीन पुस्तकांची खरेदी करताना वाचकांची मागणी,पुस्तकाच्या आवृत्त्या व त्याचे साहित्यमूल्य विचारात घेतले जाईल,त्यानुसारच पुस्तकाची खरेदी करण्यात येईल.याबाबत ग्रंथालय व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम राहील.
५.आपण महिन्याच्या कोणत्याही तारखेस सभासद झालात तरीही त्याच महिन्याच्या एक तारखेपासून सभासद शुल्क आकरण्यात येईल.(अपवाद २० तारखेनंतर झालेले सभासद)
६. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपूर्वी मासिक शुल्क जमा करावे.मासिक शुल्क ऑनलाइन,धनादेश,pay-tm(7028959596) तसेच रोख स्वरुपात स्वीकारण्यात येईल.
७.घरपोच सेवेसाठी आपण aksharbaug.com या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे,किमान 30 पुस्तके आपल्या वाचण्याच्या यादीत घ्यावीत,आपण वर्षभर जी पुस्तके वाचावयास इच्छुक आहात त्यांची यादी बनवून दयावी.घरपोच सेवा ठरलेल्या दिवशीच सकाळी ८ ते रात्री ९ यावेळेत करण्यात येईल(महिन्यातून एकदाच)
८.तुम्हाला व तुमच्या परिचयातील व्यक्तींना वाचनाची आवड आहे ,परंतु ग्रंथालयाचे सभासद होणे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल तरीही आपणास सभासदत्व देण्यात येईल .कुटुंबाचे मासिक उत्पन्न १५०००/-रु.पेक्षा कमी असल्यास आपण ग्रंथालयाची सेवा मोफत घेऊ शकता.
९. ग्रंथालयाची वेळ संध्याकाळी ५ ते ९ आहे.(शुक्रवार,शनिवार,रविवार)
१०.सभासदांच्या सूचनांचा ,तक्रारीचा स्वीकार तसेच आदर केला जाईल व त्यावर तत्पर कार्यवाहीसाठी व्यवस्थापन प्रयत्नशील राहील.
११.बाहेरगावी अथवा परदेशी जाताना आपल्याकडे असणारी ग्रंथालयाची पुस्तके ग्रंथालयात जमा करून जाणे,अन्यथा विलंब शुल्क व मासिक शुल्क जमा करणे अनिवार्य राहील.
१२.सभासदत्व बंद करताना आपली अनामत रक्कम धनादेश स्वरूपात स्वीकारावी,रोख हवी असल्यास ७ दिवसांनी ग्रंथालयास पुनर्भेट द्यावी.ही आग्रहाची विनम्र सूचना आहे.

मी वरील सर्व सूचना वाचल्या असून त्या मला मान्य आहेत