Terms & Condtions

१.ग्रंथालयाचे सभासद होण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही.condit

२.पुस्तकावर कोणत्याही प्रकारच्या खाना-खुणा करू नयेत.तसेच ती व्यवस्थित हातळावीत ही नम्र विनंती आहे.आपल्याकडून पुस्तक फाटल्यास,खराब अथवा गहाळ झाल्यास त्याच पुस्तकाची नवीन प्रत ग्रंथालयात जमा करण्यास आपण बांधील आहात.

३.पुस्तक ३० दिवसात परत करावे.अन्यथा प्रतिदिन २ रुपये अतिरिक्त शुल्क आकरण्यात येईल.

४.नवीन पुस्तकांची खरेदी करताना वाचकांची मागणी,पुस्तकाच्या आवृत्त्या व त्याचे साहित्यमूल्य विचारात घेतले जाईल,त्यानुसारच पुस्तकाची खरेदी करण्यात येईल.

५.आपण महिन्याच्या कोणत्याही तारखेस सभासद झालात तरीही त्याच महिन्याच्या एक तारखेपासून सभासद शुल्क आकरण्यात येईल.(अपवाद २० तारखेनंतर झालेले सभासद)

६. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपूर्वी मासिक शुल्क जमा करावे.मासिक शुल्क ऑनलाइन,धनादेश,pay-tm(7028959596) तसेच रोख स्वरुपात स्वीकारण्यात येईल.

७.घरपोच सेवेसाठी पुस्तकाची मागणी दूरध्वनी,व्हाट्स अप किंवा ईमेलद्वारे स्वीकारण्यात येईल.(aksharbaug@gmail.com) घरपोच सेवा ठरलेल्या दिवशीच सकाळी ८ ते रात्री ९ यावेळेत करण्यात येईल

८) तुम्हाला व तुमच्या परिचयातील व्यक्तींना वाचनाची आवड आहे ,परंतु ग्रंथालयाचे सभासद होणे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल तरीही आपणास सभासदत्व देण्यात येईल .(अटी लागू)

९) ग्रंथालयाची वेळ संध्याकाळी ५ ते ९ आहे.

१०) सभासदांच्या सूचनांचा ,तक्रारीचा स्वीकार तसेच आदर केला जाईल व त्यावर तत्पर कार्यवाहीसाठी व्यवस्थापन बांधील राहील.

मी वरील सर्व सूचना वाचल्या असून त्या मला मान्य आहेत