• Home /
  • वाचकांची सनद

वाचकांची सनद

वाचकांचे हक्क-

१.प्रत्येकास वाचनाचा हक्क आहे.
२.वाचकास कोणताही मजकूर त्याच्या इच्छेनुसार पूर्ण,अपूर्ण,मधील मजकूर गाळून, पाने पालटून वाचण्याचा हक्क आहे.
३.कोणतेही पुस्तकं वाचता तसेच ठेवण्याचा अथवा अर्धवट वाचून सोडण्याचा वाचकास हक्क आहे.
४.एखादे पुस्तक वारंवार वाचण्याचा वाचकास हक्क आहे.
५.वाचकास काहीही वाचण्याचा हक्क आहे.
६.पुस्तकातील जग वास्तव असा समज/गैरसमज करून घेण्याचा वाचकास हक्क आहे.
७.कोठेही,कसेही वाचण्याचा वाचकास हक्क आहे.
८.पुस्तकात गढून जाण्याचा,रामण्याचा वाचकास हक्क आहे.
९.प्रगट, मौन,आकलनमय वाचण्याचा वाचकास हक्क आहे.
१०.वाचनासंबंधी अभिप्राय,प्रतिसाद देण्या न देण्याचा वाचकास हक्क आहे.